मुंबईत महायुतीची बैठक सुरू, मुख्यमंत्र्यांसह दोन उपमुख्यमंत्री उपस्थित

मुंबई, १ सप्टेंबर २०२३ : एका बाजूला देशातील विरोधी पक्षाच्या नेत्यांची मुंबईतील ग्रँण्ड हयात हाँटेलमध्ये दोन दिवसीय बैठक सुरू आहे. या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व खासदार, आमदार आणि पदधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत.

महायुतीच्या या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. तर महायुतीचे सर्व पदाधिकारी देखील या बैठकीला हजर राहणार आहेत. या बैठकीत लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांवर चर्चा होणार असून, या जागा जिंकण्याचा निर्धार करण्यात येणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे.

यावेळी ठाण्याचे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, द्वेष भावनेने विरोधी पक्ष इंडिया आघाडी एकत्र आले आहेत. पण आमचं मिशन हे केवळ विकास असणार आहे. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात सर्व लोकसभा जागेवर विजय मिळवणारच आहोत.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा