नवी दिल्ली, १४ सप्टेंबर २०२३ : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. वास्तविक, आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर २ आठवडे चालणार आहे. पीव्ही सिंधूने या शिबिरात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. माजी विश्वविजेत्या सिंधूला पूर्ण पाठिंबा देत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी परवानगी दिली असून ती गचीबोवली स्टेडियम आणि सुचित्रा अकादमी येथे प्रशिक्षण घेऊ शकते. या शिबिराऐवजी ती मलेशियाचे नवे प्रशिक्षक मुहम्मद हाफिज हाशिम यांच्याकडे वेगळे प्रशिक्षण घेणार आहे.
सिंधूने आपली कारकीर्द डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय शिबिरात न जाण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक, पीव्ही सिंधूची यंदाची कामगिरी काही खास नव्हती. एकूण १५ पैकी १० स्पर्धेत पहिल्या दोन फेऱ्यांनंतर ती बाहेर पडली. सिंधू या वर्षी एप्रिलमध्येच स्पेन मास्टरच्या अंतिम फेरीत पोहोचू शकली. गेल्या महिन्यात वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या फेरीत निराश झाल्यानंतर सिंधूने BWF वर्ल्ड टूर टूर्नामेंटऐवजी आशियाई गेम्सवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय बॅडमिंटन असोसिएशनने ११ ते २४ सप्टेंबर दरम्यान पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमी येथे खेळाडूंसाठी अनिवार्य शिबिराचे आयोजन केले आहे. हांगझूला जाणाऱ्या १९ शटलर्ससाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. लक्ष्य सेन, तनिषा क्रास्टो, अश्विनी पोनप्पा आणि अनेक खेळाडू सध्या हाँगकाँग ओपनमध्ये खेळत आहेत. परतल्यानंतर पीव्ही सिंधू या शिबिरात सहभागी होणार होती.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड