मुंबई, २३ सप्टेंबर २०२३ : मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या माननीय लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह है गुंफणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सहभागी होणार असल्याचे मुंबई विद्यापीठाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘सहकार भारती’च्या सहकार्याने हे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. ‘सहकार भारती’ ही एक सहकारी संस्था आहे, ज्याची स्थापना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) नेते लक्ष्मणराव इनामदार यांनी केली होती. देशाच्या विकासात सहकार क्षेत्राला खूप महत्त्व आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले. विद्यापीठातील वाणिज्य, व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र हे विभाग सहकारी क्षेत्रात अभ्यास आणि संशोधन करतात. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह हे शहरातील गणपती मंडळांना भेट देऊन पूजा करणार आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड