पुणे, २४ सप्टेंबर २०२३ : येरवडा मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने कारागृहातील मनीऑर्डर रजिस्टर मध्ये न्याय विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हुबेहूब सह्या आणि खोट्या नोंदी करुन, २७ लाख ६९ हजार रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी येरवडा पोलीसांनी सचिन रघुनाथ फुलसुंदर या कैद्याविरुद्ध फसवणूक, अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत तुरुंगाधिकारी बापूराव भीमराव मोटे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेनंतर ‘ई-प्रिझन’ साॅफ्टवेअरच्या साह्याने संगणकाने कामे करा, असा आदेश पोलीस महासंचालक आणि कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी कारागृह प्रशासनाला दिला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर











































