माझ्याविरुद्ध हैदराबादमध्ये लढा, ओवेसींचे राहुल गांधींना आव्हान

हैदराबाद, २५ सप्टेंबर २०२३ : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माझ्याविरुद्ध हैदराबाद मतदारसंघात निवडणूक लढवावी,असे आव्हान ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी दिले आहे. हैदराबाद येथे आयोजित जाहीर सभेत बोलताना असुदुद्दीन ओवेसी म्हणाले की, राहुल गांधी यांनी आगामी लोकसभा निवडणूक वायनाडमधून नव्हे तर हैदराबादमधून लढवावी. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत.

गेल्या आठवड्यात तुक्कुगुडा,तेलंगणा येथे एका मेळाव्यात बोलताना राहुल गांधी म्हणाले की, ते तुमचे मुख्यमंत्री विरोधकांवरच हल्लाबोल करतात. ते एआयएमआयएम नेत्यांना स्वतःचे मानतात, म्हणूनच त्यांच्याविरूद्ध कोणताही खटला नाही. तेलंगणात काँग्रेस हा सत्ताधारी भारत राष्ट्र समिती यांच्यासह भाजप आणि एआयएमआयएम सोबत देखील लढत आहे. ते सगळे एकमेकांना वेगळे पक्ष म्हणतात, पण ते संगतमताने काम करत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला होता. त्यावर बोलताना ‘एआयएमआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी हे आव्हान दिले.

न्युज अनकट प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा