वर्ल्डकप मध्ये आज भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात होणार सामना

मुंबई, २ नोव्हेंबर २०२३ : टीम इंडियाचा सामना आज म्हणजेच २ नोव्हेंबरला विश्वचषक २०२३ मध्ये श्रीलंकेशी होणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. तब्बल १२ वर्षांनंतर वर्ल्डकप मध्ये दोन्ही संघ पुन्हा एकदा वानखेडे मैदानावर एकमेकांशी भिडताना दिसणार आहेत. याआधी या मैदानावर २०११ च्या विश्वचषकाचा अंतिम सामना दोन्ही संघांमध्ये झाला होता. भारतीय संघ आपले आतापर्यंतचे सर्व ६ सामने जिंकून उपांत्य फेरी गाठण्याच्या मार्गावर आहे आणि श्रीलंकेच्या संघाला ६ पैकी केवळ २ सामने जिंकता आले आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत १६७ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. जिथे भारताने ९८ सामने जिंकले आहेत आणि श्रीलंकेने ५७ सामने जिंकले आहेत. तर ११ सामन्यांचे निकाल जाहीर झाले नाहीत. मायदेशात भारताने श्रीलंकेविरुद्ध ६७ पैकी ३९ सामने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने २८ सामने जिंकले आहेत.

वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत ९ सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी ४ सामने भारताने जिंकले आहेत. तर श्रीलंकेने ४ सामने जिंकले आहेत. याशिवाय एका सामन्याचा निकाल झाला नाही.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा