मॉल्समध्ये मल्टीप्लेक्स सर्वात वरच्या मजल्यावरच का असते?

मॉल्समध्ये आपण अनेकदा फिरायला जातो किंवा फार तर फार आपण मुव्हीज पाहायला जातो. फारच क्वचित मॉल्समध्ये आपण शॉपिंगला जातो. तुम्ही कधी विचार केला आहे का कि, मॉल्समध्ये मल्टीप्लेक्स सर्वात वरच्या मजल्यावरच का असते? चला जाणून घेऊ:

सिनेमा हा असा व्यवसाय आहे जो कधीच ठप्प पडत नाही. त्यामुळे वर्षभर लोकांचा लोंढा मल्टिप्लेक्सकडे येत असतो. शॉपिंग मॉल्सच्या सर्वातवरच्या मजल्यावर मल्टिप्लेक्स बांधल्याने माणसे जेव्हा वरती यायला निघतात, तेव्हा त्यांना मॉलचे इतर मजले फिरून यावे लागतात.
लोक फक्त सिनेमा बघायचे ठरवून आलेले असतात.परंतु त्यांच्या नजरेस पडतो तो मॉलचा झगमगाट, वेगवेगळी उत्पादनं, ऑफर्स, डिस्काऊंट, सेल, इत्यादी. सिनेमा बघायला
आलेल्या व्यक्तीला मॉलची भुरळ नक्कीच पडते आणि तो काही ना काही खरेदी करूनच जातो.
अगदी सगळेच खरेदी करत नसतील तरी पुन्हा पुन्हा मॉलमध्ये यावसं नक्कीच वाटतं. याच कारणासाठी फूड-कोर्ट सुद्धा सर्वात वरच्या मजल्यावर असतो.

यातून प्रेक्षकांना आकर्षित करण्याचा मॉल वाल्यांचा प्रयत्न असतो.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा