विकीर

                                        घंटा निनाद आणि ब्रेकअप

रात्री ३  वाजता माझा फोन वाजला कि मी घाबरत नाही, ती आपल्याकडची भुताची ऑफीशियल वेळ नाही ना… निनादची सवय आहे ती, स्वीटीशी वाजल किंवा त्यांचा ब्रेकअप झाला कि या ‘गुजरात्याच्या जावयाचा'(इथून पुढे गुजा ) फोन येणार…
मी – ( झोपेत बोलतोय अस दाखवत ) हा बोल…
निनाद – झोपलेलास?
मी – नाही यार , गणितं सोडवत होतो घरी कोणी नाही ना आज…
निनाद -काय  यार, इथ वाट लागलीये आणि तू एक अस बोल्तोस…
मी- बोल, काय झालं स्वीटीच ?
निनाद – भांडण झालाय यार… ब्रेकअप केल यार तिने… तू प्लीज समजाव यार तिला , तुझच ऐकते ती …
मी –  हो, उद्या बोलतो मी तिच्याशी…
निनाद- नक्की ना…
मी- हो बाबा…
निनाद – यार तू खरच ना, सॉरी  यार मी तुला अस कधीपण  call करतो आणि तू पण … खरा मित्र आहेस… तुला सांगू…
मी – निनाद …
निनाद – ती पण झोपली नसेल…
मी – हेलो  निनाद … हेलो… हेलो ।
निनाद – हेल्लो…विकिर… हेलो
मी – हेलो… घंटया …हेलो
असा  खोटा नेटवर्क प्रोब्लेम करून मी फोन कट केला आणि सरळ ऐअरप्लेन मोडला  टाकला …  आय नो फालतू आयडिया होती पण गुजाचा शॉट  तर  गेला…

निनाद आणि स्वीटी… आमच्या ऑफिसमधल एक  कपल…  निनाद आमचा घंटा फ्रेंड, ह्याला घंटा का चिडवतात मला अजून तरी कळलेलं नाही . आणि  स्वीटी म्हणजे आमच्या ऑफिसमधली कांदिवली क़्विन ; हेतल… आता तिच नीकनेम स्वीटी आहे हे कळल असेलच… सोल्लिड लवस्टोरी आहे हा ह्यांची, महिन्याला जितके संडे येतात त्याहून जास्त वेळा  ब्रेकअप होत ह्याचं … दर महिन्याला … लास्ट टाईम तर आयफोन आणि सॅमसंगवरून… आई  शप्पथ फेकत नाहीये … निनाद ने  इतक डोक खाल्लेलं ना कि माझ्या फोनच्या पुढे “आय”घालनार होतो मी … iphone ना भेंडी…

सकाळी उठायला लेटच  झाल … चहा तर अन्नाच्या गाडीवर घेणार होतो पण मोजे सापडत नव्हते म्हणून आणखी लेट होत होत, आता चहा कॅन्सल करावा लागणार होता… आईला फोन लावून विचारल तर ‘आत्ता आठवण आली का’ च गाण चालू झाल तीच… तिथेच बघ वर call कट झाला … माझ्या आईच तिथेच असेल म्हणजे पूर्ण घरात कुठे असेल काय महित…

शेवटी…

शू मधले —

कालचेच —

सॉक्स —

घालायचं ठरवल … मोजे हातात  घेऊन वास घेतला … वास येत नव्हता तरी त्यावर deo  मारून तेच सॉक्स घतले… आणि finally निघालो…

ऑफिसमध्ये गेल्या गेल्या आणि  स्वाईप केल्या केल्या निनादचा चेहरा दिसला… करण जोहरच्या फिल्म मधल्या गे कॅरक्टर  माझ्याकडे बघतोय अस वाटल… आणि अंगावर येत बोलला – केटला टाईम? हेतल क्यां छे?
तसा त्यातला गे मायनस होऊन लवरबॉय दिसला मला…

निनाद, साल्या गुजरात्याचा जावई… आत्ताच आलोय  ना  मी …  तिला येउदे ना…

निनाद- विकीर सगळ तुझ्या हातात आहे आता…

इतक्यात हेतल आली… तसा हा तिच्या जवळ गेलातर ती त्याला फाट्यावर  मारून गेली…

जानू, मेरा बच्चा… हनी … असल काही नव्हत तिच्या तोंडी…

मी निनादचा चेहरा पाहिला बिचारा, नवीन MAGGIE चा stock रोज चेक करून पण न मिळणाऱ्या
मुलासारखा झाला होता…

दुपार पर्यंत मी कसाबसा निनादपासून स्वत:ला लपवत होतो… शेवटी नेमकी हेतल मला हाक मारत आली,
लगेच निनाद मध्ये वेगळीच शक्ती संचारली आता त्याची माझ्याकडची नजर आणि त्यामुळे माझ्यावर असलेल्या प्रेशर मला हनुमानाच्या शेपटी इतका वजनदार वाटत होता …

अरे आपना  सेक्युरिटी लोग  का डेपार्टमेंट का पूजा को जाना है ,   चल ना विकीर सब जाके आते है … इति स्वीटी…

पुढच्या दहा मिनिटांमध्ये आमच्या डेपार्टमेंटची टीम , खाली पूजेला जायला रेडी केली होती… अर्थात कमांडर होती हेतलबाई…

खाली गेल्यावर सगळ्यात जास्त माझी गोची होणार होती… झालीच… शूज काढायचे होते… साईबाबा कडे आता एकच मागणं होत – मोज्यांचा वास नाही आला पाहिजे… भेंडी… शीट , देव आहे समोर शिवी नको विकिर… मीच मला ओरडलो… तसा निनाद आत आला… मीच त्याला बोललो साल्या सॉक्स तरी धुतलेले घालायचेस… तसा निनाद ने चेहरा बारीक केला – दोन कारण असतील – एक तर हेतल प्रकरण त्याच्या लेखी मीच हाताळत होतो आणि दुसर – मे बी त्याने खरंच सॉक्स धुतले नसतील…

निनाद – अरे मी… काही न बोलता गप्प झाला तो… हेतल होती ना … तसा मी स्वत: पादून दुसऱ्याला का पादलास  विचारणाऱ्या हुशार लोकांसारखा चेहरा केला…साईबाबा पावला होता मला… सगळे निनाद वर हसत होते…
हेतल च्या चेहऱ्यावर थोडी sympathy  दिसत होती पण ती गुज्जूबेन इतक्यात पटणारी नव्हती…

हळूहळू सगळे दर्शन घेत होते… सत्यनारायण होता… शेवटी हेतल आली आणि शेजारच्या सिक्युरिटी पैकी एकाला विचारल – इधर मंदिर में  होता ही वैसा घंटा नही लगाया  क्या ?  मैं बजाने वाली थी अभी … तसा निकेतन – घंटा बोल्ली हेतल ,करून हसायला लागला…. तसे सगळेच हसायला लागले… मी तर निनादच्या खांद्यावर हात ठेवूनच हसत होतो… बिचारा निनाद गर्लफ्रेंडच घंटा बोलली म्हणून किती दु:खी झाला असेल…
ब्रेकअप पेक्षा जास्तच कदाचित… त्याला वाटल आता हेतल आपल्याला काही परत मिळणार नाही…

तश्या आमच्या हेतलला कळल, कि तिने नकळत आपल्याच छाव्याला चिडवल होत… त्या गोंधळामध्ये सगळे
हसत असताना – शोना सोरी रे ,मी तुला नाही बोल्ली … चुकून आल ते… यु नो न…
निनाद- its ok bachha…

अशी वाक्य ऐकली … patchup झालं होत… पुढची  वाक्य, त्यांच्या नेहमीच्या सवयी सारखी कुजबुजत बोलल्यासारखी वाटली… बहुतेक डब्यातला मेनू डिस्कस करत होते…

गप्प शूज घालून निघालो मी… दुसऱ्या कोणाला माझ्या सॉक्सच रहस्य कळायच्या आत…

थोड्या वेळाने डेस्क जवळ निनाद आला, THANKS बोलून गेला … मी ग्रेट अस काही केल नव्हत, मुळात काहीच केल नव्हत.
पण  त्याच्याकडे पाहिलं, हेतलला घेऊन जेवायला निघाला होता कॅन्टीनमध्ये… लांबनच मला विचारला- येतोस का ?

मी नाही म्हणून मान डोलवली… तसे दोघे छान बोलत निघून गेले…

लहान मुलांसारखे वागतात दोघे, डोक्यात जातात पण त्यांचा हाच एकमेकांसाठीचा जिव्हाळा छान वाटतो …

काहीतरी छान होत दोघांमध्ये…

काय माहित इतिहासात ह्यांच प्रेम अमर होईल कि नाही पण दोघे नेहमी सुखी राहिले म्हणजे झाल…

पण लवस्टोरीच नाव विचित्र नसत वाटल का?

निनाद हेतल… नाही

घंटा हेतल… शी… नको ह्यांना इतिहासात  पाठवायला …

क्रमश:

© अविनाश उबाळे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा