स्वच्छता प्र‍िमीअर लीग’, चाळीसगाव नगरपरिषदेचा अनोखा उपक्रम

चाळीसगाव, जळगाव ७ डिसेंबर २०२३ : चाळीसगाव नगरपरिषदेच्या वतीने नागर‍िकांमध्ये शहर स्वच्छतेची भावना रूजावी तसेच कर्मचाऱ्यांमध्ये कामाप्रती बांध‍िलकी न‍िर्माण व्हावी. यासाठी स्वच्छता प्रीम‍िअर लीग २०२३-२४ या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शासनाच्या माझी वसुंधरा अभियान, स्वच्छ सर्वेक्षण २०२३-२४, मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा २०२३, नमो ११ कलमी कार्यक्रम अंतर्गत शहर स्वच्छता अभियानातील या प्रीम‍िअर लीगला नागर‍िक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला आहे.

चाळीसगाव नगरपर‍िषदेचे मुख्याधिकारी प्रशांत ठोंबरे यांच्या संकल्पनेतून स्वच्छता प्रीमिअर लीग २०२३-२४ चे ९ ड‍िसेंबर २०२३ पर्यंत आयोजन करण्यात आले आहे. नगरपर‍िषदेच्या आरोग्य शहरात स्वच्छता अभ‍ियान देखील राबव‍िले जात आहे. यात नागर‍िकांच्या व‍िव‍िध प्रत‍िक्र‍िया, समस्या समजून घेत नगरपर‍िषदेकडून व‍िव‍िध प्रकारच्या उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याची अमलबजावणी देखील नगरपाल‍िकमार्फत करण्यात येत आहे. शासनाच्या स्वच्छता विषयक सूचना एकत्रित करून स्वच्छतेचे १४ निकष ठरविण्यात आले असून त्याआधारे प्रभागातील स्वच्छतेचे मूल्यमापन करण्यात येणार आहे. ९ ड‍िसेंबर रोजी लोकसहभागातून स्वच्छता करून अभियानाची सांगता करण्यात येणार आहे.

या लीग मध्ये पर्यावरण पूरक नावे देऊन प्रभागानुसार टीम तयार करण्यात आल्या असून मुकादम त्या टीम चे कर्णधार असतील व त्याच्या अख्यारीत कर्मचारी सदस्य असतील. अश्या एकूण १८ टीम असून त्याची स्पर्धा समतुल्य प्रभागाशी होईल. प्रत्येक टीमला ऍक्टिव्ह मोड वर स्वच्छता करण्याकरिता १ मार्गदर्शक नेमण्यात आले आहेत. तसेच स्वच्छतेच्या १४ निकषानुसार प्रभागातील कामाचे मूल्यमापन करणेसाठी चाळीसगाव नगरपाल‍िका शाळाचे शिक्षकांची परीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : डॉ.पंकज पाटील

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा