मुंबई : देशात तसेच राज्यात सध्या वेगवेगळ्या राजकीय घडामोडी वेगात घडत आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक क्षेत्रातील व्यक्ती आपले मत मांडत असून कलाकार मंडळीही यामध्ये मागे नाही. चित्रपट अभिनेते तसेच दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील सरकारवर नाराजी व्यक्त करत सरकारकडून आता कसलीही अपेक्षा नसल्याचे म्हटले आहे.
यावेळी पुढे तरडे म्हणाले की, सरकारकडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत. अपेक्षा ठेवावी असे वातावरणही महाराष्ट्रात नाही. सरकारविषयी माझा मनात काय आहे, हे माझ्या चित्रपटातुन बाहेर येते.
एक शेतकरी म्हणून, दिग्दर्शक म्हणून सध्या जे काही चालू हे त्यावर मी नाराज आहे. सरकार प्रत्येक ठिकाणी येणार नाही. तसेच काहीच आशादायी वातावरण नाही.
दरम्यान, नाशिकमध्ये महिला अत्याचार संदर्भात विशेष परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रवीण तरडे, पोलीस अधिक्षक विश्वास नांगरे पाटील तसेच अभिनेत्री मुक्ता बर्वे आदी मान्यवर उपस्थित होते.