नांदगाव, नाशिक १३ डिसेंबर २०२३ : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना न्याय मिळावा म्हणून नांदगाव मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी सरकारचे लक्ष वेधले. यावेळी त्यांनी आक्रमकपणे आपले मुद्दे सभागृहात मांडले.
आमदार सुहास कांदे यांनी, पिक विमा कंपनी फक्त शेतकऱ्यांना मारण्यासाठी असुन केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एखादी कंपनी स्थापन करून या माध्यमातून शेतकरी बांधवांना मदत करावी अशी मागणी यावेळी केली. तसेच संपूर्ण नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर व्हावा, भारडी, बाणगाव, न्यायडोंगरी हे मंडळ दुष्काळ जाहीर करावे, शेतकऱ्यांना मागील वर्षीचे आणि या वर्षीचे कांद्याचे अनुदान ताबडतोब देण्यात यावे, गारपीट अतिवृष्टीमध्ये गाय बैल म्हैस यांना मोठ्या प्रमाणात इजा व मृत्यू झाला आहे यांची भरपाई देण्यात यावी, माझ्या मतदारसंघात चारा संपत आला आहे त्यासाठी राज्य सरकारने चारा छावणी सुरू करावी. अशा विविध मागण्या आमदार सुहास कांदे यांनी हीवाळी अधिवेशनाच्या माध्यमातून सरकारकडे मांडल्या.
न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे