ठाणे पोलिसांची कामाची वेळ आठ तास करणार : एकनाथ शिंदे

ठाणे : मुंबई वगळता राज्यात पोलिसांच्या कामाची वेळ १२ तासांची असून, पोलिसांवर प्रचंड ताण येत आहे. मुंबई पोलिसांना जशी ८ तासांची ड्युटी आहे, तशीच ठाणे जिल्ह्यातील पोलिसांच्या कामाची वेळ ८ तास करण्याचा सरकारचा मानस आहे. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईन, असे आश्वासन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

रविवारी (दि.१५) रोजी ठाण्यातील पोलीस वसाहतींचा पाहणी दौरा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. यावेळी शिंदे यांनी पोलीस कुटुंबीयांशी संवाद साधला. पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण असतो. त्यात त्यांच्या कामाचा कालावधी कमी करून तो आठ तासांचा करण्याचा आमच्या सरकारचा विचार आहे.याबाबत लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून त्यावर ठोस उपाय शोधला जाईल, असे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकर हे राज्याचे नव्हे, देशाचे दैवत आहेत. त्यांनी देशासाठी त्याग केला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भूमिका स्पष्ट केलेली आहे.

सावरकर हे आम्हाला आदरस्थानी आहेत आणि महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार आहे. या सरकारचे उद्धव ठाकरे नेतृत्व करत आहेत. या राज्याच्या हितासाठी हे सरकार आहे. त्यामुळे तिन्ही पक्षात कुठेही मतभेद नाहीत, असेही या वेळी एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा