महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगणार

46

पुणे: महाराष्ट्रातील मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यामध्ये २ ते ७ जानेवारी २०२० दरम्यान रंगणार आहे.
ही स्पर्धा दरवर्षीप्रमाणे माती आणि गादी अशा दोन्ही प्रकारात होणार असून पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडानगरी, बालेवाडी येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्याला तब्बल १२ व्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्याचा मान मिळाला आहे. गतवर्षी ही स्पर्धा जालना येथे पार पडली होती. तेव्हा बाला रफीक शेखने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
सलग ३ वेळा विजयी कुस्तीपटू : महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सलग तीन वेळा जिंकण्याचा मान आजपर्यंत फक्त दोन कुस्तीपटूंना मिळवता आला आहे.