मोदी सरकार नव्हे, भारत सरकार म्हणत विकास संकल्प चित्ररथाला विरोध

धाराशिव १३ जानेवारी २०२४ : मोदी सरकार नव्हे,भारत सरकार म्हणा असे म्हणत लोहारा येथील नागरिकांनी संकल्प चित्ररथाला विरोध केला, नागरिकांचा वाढता विरोध पाहुन संकल्प चित्ररथा बरोबर असणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांची भंबेरी उडाली होती, नागरिकांचा उद्रेक पाहुन संबधित कर्मचाऱ्यानी चित्ररथाला तेथुन परत नेण्याची नामुष्की ओढावली. भारत सरकारच्या वतीने देशातील जिल्हया जिल्हयात संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आलय, केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती या चित्र रथाच्या माध्यमातुन दिली जाते.

संकल्प यात्रेचा लोहारा नगरपंचायत कार्यालयासमोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मोदी सरकार नाही भारत सरकार म्हणा, असे म्हणत नागरिकांनी मोदी सरकारची हमी चित्ररथ कार्यक्रमस्थळावरून हाकलून लावले. केंद्र सरकार केलेली कामे व योजनांची माहिती देण्यासाठी केंद्र सरकारने विकसित भारत संकल्प यात्रा सर्वत्र काढली आहे. ‘मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी’ अशी टॅगलाइन दिली आहे. या चित्ररथाच्या माध्यमातून विविध योजनांची माहिती नागरिकांना दिली जात आहे.

लोहारा नगरपंचायतीने कार्यालयासमोर विकसित भारत संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आठवडी बाजार असल्याने नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात ‘मोदी सरकार म्हणजे विकासाची हमी’ या चित्ररथावरून योजनेची माहिती दिली जात असताना उपस्थित नागरिकांनी मोदी सरकार यावर आक्षेप घेत कार्यक्रम बंद केला.

न्यूज अनकट प्रतिनिधी : रहीम शेख

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा