भोकरदन, १७ जानेवारी २०२४ : भोकरदन तालुक्यातील मालखेडा शिवारात जुगार अड्डयावर भोकरदन पोलिसांनी धड़क कारवाई करत १० जणांवर गुन्हा दाखल करून ३ लाख ५ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
मालखेडा शिवारात पोद्दार शाळेच्या पाठीमागील गायरणात जुगार खेळत असताना भोकरदन पोलिसांना आढळून आले. या कारवाईत पत्याचा कैट, ४४ हजार ५२० रु. रोख रक्कम, ९ मोबाईल, ५मोटरसायकल असा एकूण ३ लाख ५ हजार ५२० रु. मुद्देमाल जप्त केला आहे.
गणेश पिंपळकर यांच्या फिर्यादी वरुण आरोपी- दत्ता छगन पाथरे (रा. सिल्लोड), योगेश येडुबा गाडेकर (रा. पिंपरी, ता सिल्लोड), विठ्ठल सुखदेव खिस्ते (रा.पिंपरी, ता. सिल्लोड), अरुण कैलास खेकाळे (रा. पेरजापुर ता. भोकरदन), नवनाथ भानुदास जाधव (रा. पेरजापुर, ता. भोकरदन), करण समाधान गाढे, (रा.प्रल्हादपुर, तालुका भोकरदन), राम रतनसिंह राजरवाल (रा.मालखेडा), भगवान कडूबा राऊत (रा. मालखेडा), योगेश शेषराव सुरासे (रा. मालखेडा, ता. भोकरदन), आकाश भगवान राऊत (रा. मालखेडा) यांच्या वर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सहाय्य्क पोलिस बालाजी वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. पुढील तपास भोकरदन पोलिस करीत आहेत.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे