रजनीकांतच्या ‘दरबार’ चा ट्रेलर प्रदर्शित

मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत आपल्या हटके भूमिकांसाठी ओळखले जातात. यामुळेच त्यांचा चाहता वर्गही मोठ्या प्रमाणावर आहे. दरम्यान त्यांच्या बहुचर्चित आगामी सिनेमा ‘दरबार’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे.
रजनीकांत या चित्रपटात तब्बल २८ वर्षानंतर पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी १९९२ मध्ये ते ‘पांडियन’ या तामिळ चित्रपटात पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसले होते.
या चित्रपटात अभिनेत्री नयनतारा, अभिनेता प्रतीक बब्बर, नवाब शाह आणि सुनील शेट्‌टी इत्यादी कलाकार आहेत. ए.आर. गुरुगादास दिग्दर्शित हा चित्रपट ९ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होणार आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा