मुंबई : राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारने ६ हजार ६०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. त्यापैकी २ हजार १०० कोटी रूपये वितरित केल्याची माहिती अर्थमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
विरोधी पक्षाच्या प्रश्नाला उत्तर देताना जयंत पाटील बोलत होते. सरकारमार्फत मदतीचे वाटप असून, मंजूर ६ हजार ६०० कोटी रुपयांपैकी २ हजार १०० कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांमार्फत वितरित केले आहे.
दरम्यान शिल्लक राहिलेली रक्कम लवकरच जमा होणार असल्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने केंद्राकडे १४ हजार ६०० कोटी रुपयांची मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यातील शेतकऱ्यांना सर्वोतोपरी मदत राज्य सरकार करेल, शेतकऱ्यांना आमचे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही असेही विरोधकांना त्यांनी ठणकावून सांगितले.