रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त आज जालना जिल्ह्यात ड्राय डे

जालना २२ जानेवारी २०२४ : श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जालना जिल्ह्यात २२ जानेवारी रोजी ड्राय डे जाहीर करण्यात आलाय. जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी दारू दुकाने बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत. अयोध्या नगरीत आज २२ जानेवारी रोजी श्री राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळयाचे आयोजन केलेले आहे. सदर दिवशी संपुर्ण भारत देशात व महाराष्ट्रात भव्यदिव्य असा धार्मिक उत्सव साजरा होणार आहे. तसेच मिरवणुका व इतर कार्यक्रम आयोजीत केले गेले आहेत.

आजच्या दिवशी काही अनुचित प्रकार घडणार नाही याकरीता जालना जिल्ह्यात शांतता आणि कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत ठेवण्यासाठी जालना जिल्हाधिकारी यांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान जिल्हयातील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्यविक्री अनुज्ञप्त्यांचे व्यवहार आज रोजी मद्य विक्रीसाठी बंद ठेवण्याचे आदेश देत कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन केले आहे.

सदर आदेशाचे पालन सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कसुरदार अनुज्ञप्तीधारकांविरुध्द नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा