जालना २२ जानेवारी २०२४ : जालन्यात श्रीराम प्राणप्रतिष्ठान सोहळा व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाचा शिधा वाटप कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलीय. जालना तहसीलदार छाया पवार व नायब तहसीलदार मंगला मोरे यांच्या हस्ते शिधा वाटपाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी तहसीलदारांच्या हस्ते दहा ते बारा ग्राहकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. सदरील शिधा सर्व रास्त भाव दुकानांमध्ये येणाऱ्या तीन ते चार दिवसात उपलब्ध होईल अशी माहिती स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शहराध्यक्षांनी दिली.
न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी










































