भोकरदनमध्ये शोभायात्रेत घुमला श्रीरामाचा जयघोष

5

भोकरदन, २३ जानेवारी २०२४ : श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त काल भोकरदन येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते क्रीडा प्रबोधिनी मैदानापर्यंत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. ‘जय श्री राम’ या जयघोषामुळे आणि ढोल ताशाच्या गजरामुळे भोकरदन शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. या शोभायात्रेत आ. संतोष दानवे आपल्या कुटुंबासोबत सहभागी झाले होते.

अनेक वर्षाची प्रतीक्षा संपून प्रभू श्रीराम आयोध्येच्या श्रीराम मंदिरात विराजमान झाले आहेत, त्यामुळे श्रीराम भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला होता, हे या शोभायात्रेच्या माध्यमातून दिसून आले. या शोभायात्रेचे क्रीडा प्रबोधनी मैदान येथे सभेमध्ये रूपांतर झाले. यावेळी आ. संतोष दानवे यांनी सपत्नीक विधिवत पूजा केली. त्यानंतर ह. भ. प. संतोष महाराज आढावणे यांचे प्रबोधनपर किर्तन झाले. तसेच आ. दानवें यांच्या हस्ते मतदार संघातील कारसेवकांचा सत्कारही करण्यात आला.

याप्रसंगी सौ. निर्मलाताई रावसाहेब पाटील दानवे, जि.प. सदस्या सौ. आशाताई पांडे, ह. भ. प. श्री. संतोष महाराज आढावणे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माता-भगिनी आणि मोठ्या संख्येने प्रभु श्रीराम भक्तांची उपस्थिती होती.

न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा