लातूर, २ फेब्रुवारी २०२४ : पोलीस अधीक्षक नवदीप अग्रवाल यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर लातूर शहरातील विवेकानंद व गांधी चौक पोलीस ठाणे हद्दीत वेगवेगळ्या ठिकाणी छापा मारून जुगार खेळणारे व खेळवणाऱ्या इसमावर कारवाई करण्यात आली आहे.
मळवटी गावात, लायक शेख यांच्या शेतात तसेच कोल्हे नगर, लातूर येथील अजित देशमुख यांच्या घरात छापेमारी करून बेकायेशीररित्या जुगार खेळत व खेळवीत असताना दिसून आलेल्या एकूण २५ इसमावर कार्यवाही करत त्यांच्याकडून रोख रक्कम व जुगाराचे साहित्य असा एकूण ६ लाख ८ हजार ६०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
न्यूज अनकट प्रतिनीधी : सलीम शेख