जालना, ६ फेब्रुवारी २०२४ : जालन्यात भाजपच्या गाव चलो अभियानाच्या अनुषंगाने पूर्व तयारी बैठक आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हमीबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच कल्याणकारी योजनांपासून वंचित असलेल्या जनतेला लाभ देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ४ ते ११ फेब्रुवारी दरम्यान गावोगावी जाऊन ‘गाव चलो अभियान’ चालविले जाणार आहे. जालना विधानसभेच्या ६४ शक्तीकेंद्र व ३१९ बूथ सर्व मतदारांपर्यंत पोहचवण्यासाठी ४ ते ११ फेब्रुवारीपर्यंत गाव चलो अभियान राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत भाजपाच्या ३१९ बूथ प्रमुख, बूथ समितीचे ३५०० कार्यकर्ते, ६४ शक्तीकेंद्र प्रमुख, ६४ प्रभारी, ११० सुपर वारियर व शेकडो कार्यकर्ते गाव चलो अभियानद्वारे भाजपची बूथ रचना पडताळणी, संगठन बांधणी, मोदी सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविणारा आहे. त्याच अभियानाच्या पूर्व तयारीची बैठक जालन्यात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत पार पडली. हे अभियान यशस्वीपणे राबविण्याच्या सूचना देत अभियानाचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना दानवे यांनी यावेळी उपस्थितांना दिल्यात. यावेळी भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : विजय साळी