आज ही तेजी कायम

मुंबई : गुंतवणूकदारांनी खरेदीचा उत्साह कायम ठेवल्याने बुधवारी सेन्सेक्स आणि निफ्टीची तेजीची दौड कायम आहे. बाजार उघडताच सकारात्मक सुरुवात करणारा मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स १७० अंकांनी वधारला असून त्याने ४१ हजार ५०० अंकांचा निर्णायक टप्पा पार केला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५० अंकाच्या वाढीसह १२ हजार २०० अंकावर आहे.
बाजारात ऑटो, मेटल,टेक, फायनान्स या क्षेत्रात खरेदी सुरु आहे.पिरामल एन्टरप्राइज, मारुती सुझुकी, एनबीसीसी, आयआरबी इन्फ्रा, आरकॉम, डीएचएफएल, येस बँक या शेअरमध्ये सर्वाधिक व्यवहार झाले. एमएमटीसी, जिंदाल स्टील, एचडीएफसी बँक, विप्रो या शेअरमध्ये वाढ झाली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा