महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून तपासणी बरोबर मोफत शस्त्रक्रिया देखील केल्या जातील : डॉ. भारती पवार

8

दिंडोरी, नाशिक, १३ फेब्रुवारी २०२४ : नाशिकच्या दिंडोरी ग्रामीण रूग्णालय येथे आयोजित वैद्यकीय व दंत आरोग्य शिबिराचे उद्घाटन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण आणि आदिवासी विकास राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते आज पार पडले. डॉ. भारती पवार यांनी बोलतांना सांगितले की, आता केंद्र सरकारने देखील राज्यांना सूचना दिल्या आहेत की जिथे शक्य आहे तिथे तात्काळ तुम्ही कॅम्प आयोजित करा, स्क्रीनिंग करा, ज्यांना गरज आहे त्यांचे ऑपरेशन्स करून घ्या. अंधत्वाचं प्रमाण वाढू नये म्हणून केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. राज्य सरकार देखील वेगवेगळ्या ठिकाणी हे कॅम्पस आयोजित करत आहेत. तसेच उपजिल्हा रुग्णालय, पीएमसी, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल अशा वेगवेगळ्या ठिकाणी पेशंटला स्क्रीनिंग करून जिथे गरज आहे तिथे पेशंटला तात्काळ मदत केली जाते. कॅटरॅक सर्जरी फ्री व्हावी म्हणून सरकारने पूर्णपणे अनुदान दिलेले आहे. माझी एवढीच विनंती आहे की आपण सुद्धा याचा जनजागर करा ज्यांना अडचणी असतील त्यांनी रुग्णालयाशी संपर्क साधा असेही डॉ. भारती पवार यांनी सांगितले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा