नागपूर १६ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने राजव्यापी आंदोलनाला ९ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून यावेळी अपर कामगार आयुक्त नागपूर यांना समितीच्या वतीने निवेदन सादर केले गेले. याप्रसंगी विकी कावळे, सुकेश गुर्वे,अभिजीत माहुलकर आणि योगेश सायवणकर हे कृति समिती पदाधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्रतील वीज कंत्राटी कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्यास महाराष्ट्र ‘अंधारमय’ होईल असा इशारा यावेळी समितीने दिलाय.
कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी ते सतत आंदोलन होत आहेत. कंत्राटी कामगारांना ३० टक्के पगार वाढ देण्यात यावी. तसेच वयाच्या ६० व्या वर्षी शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी आणि इतरही कामगारांच्या मागण्या मान्य कराव्या, यासाठी महाराष्ट्रातील २८ कंत्राटी कामगार संघटना एकत्रित येऊन आंदोलन करीत आहे. पदाधिकाऱ्यांनी महानिर्मिती, महापारेषण आणि महावितरण मधील महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने अप्पर कामगार आयुक्त कार्यालयासमोर कंत्राटी कामगारांना संबोधित केले. यावेळी असंख्य कंत्राटी कामगार उपस्थित होते.
न्युज अनकट प्रतिनिधी : नीता सोनवणे