पंढरपूर, २० फेब्रुवारी २०२४ : भेटी लागी जीवा, लागलीस आस… असं म्हणत माघी यात्रेच्या निमित्ताने वारकरी भाविक दर्शन रांगेत गर्दी करत आहेत. या वारकरी भाविकांना श्रीचा प्रसाद म्हणून तांदळाची आणि साबुदाण्याची खिचडी वाटप करण्यात येत आहे, खिचडी बरोबर चहा व मिनरल वॉटर देखील देण्यात येत असल्याचे कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके यांनी सांगितले.
काल सकाळी ९ वाजता दर्शन रांगेत खिचडी वाटपाचा शुभारंभ मंदिर समितीच्या सदस्या श्रीमती शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर, कार्यकारी अधिकारी श्री राजेंद्र शेळके व विभाग प्रमुख श्री ज्ञानेश्वर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. तसेच पत्रा शेड येथील अन्नछत्रांमध्ये आज पुरी भाजी चे वाटप करण्यात येत आहे.
प्रसाद घेऊन वारकरी भाविक कृतज्ञता व्यक्त करीत होते. दर्शनासाठी आलेल्या भक्ताच्या मुखात प्रसाद रूपी दोन घास पडावे व कोणीही उपाशी जावू नये याची मंदिर समितीने खबरदारी घेतली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – नवनाथ खिल्लारे