नांदगाव, नाशिक २० फेब्रुवारी २०२४ : नाशिकच्या नांदगाव शहरातील मल्हारवाडी भागातील महिलांनी पाण्याचे हंडे घेऊन नांदगाव-येवला रोडवर रस्ता रोको आंदोलन केले. अचानक रास्ता रोको केल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ पहावयास मिळाली. या भागातील नागरिकांना गेल्या दोन महिन्यांपासून पाणी पुरवठा न झाल्याने संतप्त महिलांनी आंदोलन केले.
हायवेवर रास्तारोको केल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. नगरपालिका प्रशासनाकडुन मल्हारवाडी ग्रामपंचायतीला गेल्या ऑगस्ट महिन्यात पाण्याचे नियोजन करावे असे सांगण्यात आले. तरीही नियोजन झाले नाही. यावेळी लोकांच्या भावना समजून दोन दिवसांनी पाणी देण्यात येणार असल्याने नगर पालिकेने सांगितल्यावर हे आंदोलन मागे घेण्यात आले. नांदगाव पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत रस्ता मोकळा केला.
न्युज अनकट प्रतिनीधी : नाना आहिरे