जालना २० फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले व जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या सुचनेवरून आज भोकरदन तालुका कॉंग्रेस कमिटीच्या वतीने तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष ञिबंकराव पाबळे, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, श्रावण आक्से, आम आदमी पार्टीचे बोरसे गुरूजी, शेतकरी संघटनेचे काकासाहेब साबळे यांची भाषणे झाली. नंतर तहसीलदार संतोष बनकर यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख म्हणाले की केंद्र सरकार व राज्यातील ट्रिपल इंजिन, जुलमी, हुकुमशाही सरकार शेतकरी, शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, असंघटित कामगार विरोधी धोरणाची अंमलबजावणी करून या सर्व घटकांची पिळवणूक करीत आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादित शेती मालाची हमीभावा पेक्षा कमी भावात व्यापारी कापूस, सोयाबीन, कांदा,तुर इत्यादीची सर्रास पणे खरेदी करून शेतकऱ्यांची लूट करीत असुन शासनाचे या व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारे नियंत्रण राहिलेले नसुन व्यापाऱ्यांची व सरकार ची युती असल्याची शक्यता नाकारता येत नाही .याच बरोबर शेतमजूर, सुशिक्षित बेरोजगार, असंघटित कामगार व सर्वसामान्य यांना सरकारने नुसतेच झुलवत ठेवले असून फक्त यांचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून वापर करण्यात येतोय. सरकार च्या या सर्व जुलमी तथा हुकुमशाही कारभाराला जनता ञस्त झाली असून आगामी निवडणुकीत या सरकारला जनता धडा शिकविणार असल्याचे ते म्हणाले.
या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, युवक जिल्हाध्यक्ष राहुल देशमुख, ता.अध्यक्ष ञिबंकराव पाबळे, श्रावण आक्से, असंघटित कामगारचे सुखदेव रावळकर, कैलास सुरडकर, मा गटनेते संतोष अन्नदाते, साळुबा पा. लोखंडे, सोशल मीडियाचे सोपान सपकाळ, रविंद्र साळवे, अजय पगारे, जुनेद शेख, सादीक शेख, विष्णु भालेराव, रतन दाभाडे, विश्वास वाघ, जावेद खा पठाण, अजिम शेख, साहेबराव गाडेकर, काकासाहेब साबळे, बापु पाटील, भिकाजी पाथरकर यांच्या सहया आहेत.
न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे