उदगीर, २१ फेब्रुवारी २०२४ : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील यांना आज उदगीरमधील पशुवैद्यक महाविद्यालयात माविम पुरस्कृत प्रशिक्षण कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी पशुसखीसोबत संवाद साधताना ते म्हणाले कि, महिलांचे पशुसंवर्धनातील योगदान वादातीत आहे. कौटुंबिक जबाबदारीसह पशुपालनातील बहुतांश कार्ये महिला करीत असतात. मात्र त्यांच्या योगदानाला कायम दुय्यम महत्त्व दिले जाते. बहुतांश वित्तीय, विपणन आणि विस्तार सेवेपासून त्या अलिप्त राहतात. ग्रामीण महिला शेळीपालन सहज करू शकतात. त्यांना बचत गट, उत्पादक कंपनी अशा माध्यमातून संघटित करणे आणि त्यांच्यात उद्यमिता रुजविणे आवश्यक आहे.
यावेळी मंचावर माफसुचे संशोधन संचालक डॉ. नितीन कुरकुरे, पशुवैद्यक महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. नंदकुमार गायकवाड, मत्स्यविज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. बी. आर. खरटमोल, दुग्धतंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. एम. आर. पाटील, प्रकल्प समन्वयक डॉ. धनंजय देशमुख आणि प्रकल्प सह-समन्वयक तथा प्रशिक्षण समन्वयक डॉ. नरेंद्र खोडे उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सुधाकर नाईक