सातारा, २२ फेब्रुवारी २०२३ : सातारा लोकसभा मतदारसंघात महायुतीत रस्सीखेच पाहायला मिळत असताना पुन्हा एकदा भाजपचे आमदार यांनी माढा आणि सातारा लोकसभा भाजपच लढवणारअसल्याचा दावा केला आहे.
सातारा लोकसभा निवडणुकीत चांगलेच राजकीय वातावरण तापलेले पहायला मिळत आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीने तसेच शिंदे गटाच्या शिवसेनेने देखील लोकसभेचा उमेदवार आमचा असल्याचा दावा केला असून याविषयी भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी माढा लोकसभा आणि सातारा लोकसभा भाजप पक्ष लढवणार असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला आहे. यामुळे महायुतीत सध्या उमेदवारी बाबत रस्सीखेच पाहायला मिळत आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले