दरोडेच्या तयारीत असलेल्या कारचा पाठलाग करून सातारा पोलिसांनी दोन दोघांना घेतले ताब्यात तर तिघे झाले फरार

सातारा, २४ फेब्रुवारी २०२४ : दरोडेच्या तयारीत असलेल्या कारचा पाठलाग करून सातारा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तर तिघे फरार झाले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयितांनाकडून दोन तलवारी, मिरची पूड आणि दरोडा टाकण्यासाठीचे इतर साहित्य व एक स्कॉडा कार केली जप्त केली आहे.

सातारा शहर परिसरातील राधिका रोडवर एका स्कॉडा गाडीतून अज्ञात आरोपी दरोडेच्या तयारीत असल्याची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाली होती. सातारा शहर पोलिसांनी तात्काळ या गाडीचा पाठलाग करत त्यांना राधिका रोडवरील छत्रपती प्रतापसिंह शेती फार्ममध्ये त्यांची गाडी अडवली. यामधील दोन आरोपींना ताब्यात घेण्यात सातारा शहर पोलिसांना यश आले. तर तीन संशयित आरोपी घटनास्थळावरून पळून गेले आहेत. ताब्यात घेण्यात आलेल्या दोन संशयित आरोपींकडून दोन तलवारी मिरची पूड आणि दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य व एक स्कॉडा गाडी असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी सातारा शहर पोलिसांनी एक पथक रवाना केले आहे. या घटनेचा अधिक तपास एपीआय अविनाश माने व त्यांची टीम करत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : ओंकार सोनावले