भोकरदन, जालना २५ फेब्रुवारी २०२४ : भोकरदन शहरात गुरु रविदास बहुभाषिक चर्मकार समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रा व समाज मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंचायत समिती येथून सर्व बहुभाषिक चर्मकार समाजातील महिला भगिनी व समाजबांधवांचे उपस्थितीत शोभायात्रा निघाली. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणूक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात आल्यानंतर अभिवादन करण्यात आले. पुढे छत्रपती शिवाजी महाराज चौकात शहरातील सर्व मान्यवर व समाज बांधव यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
यावेळी फुगडी व इतर खेळ प्रकारचे प्रदर्शन झाले. फटाक्यांच्या जोशात व फुले शाहू, आंबेडकर, गुरु रविदास, शिवाजी महाराज यांच्या गीतांनी उत्साहमय वातावरण होते. यावेळी मुकेश चिने, सुरेशजी शर्मा, तळेकर मामा, डॉक्टर जैन साहेब, श्री बोर्डे नगरसेवक तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव समितीचे सर्व सदस्य यांनी रॅलीत गुरु रविदास यांना अभिवादन केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात पुढे आल्यानंतर पत्रकार श्री फकीरा शेठ तसेच श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक श्री कृष्णा शेठ हिवरकर ,किशोर शेठ सराफ यांनी अभिवादन केले, त्याचप्रमाणे श्री श्रावण कुमार अक्से व संपूर्ण परिवाराने प्रतिमापूजन व अभिवादन केले. मिरवणूक पुढे छत्रपती संभाजी चौकात असतांना केंद्रीय मंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे व भोकरदन चे आमदार श्री संतोष पाटील दानवे यांनी प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभाग घेतला व पायी मिरवणुकीत घोषणा देत म. फुले चौकापर्यंत आले. त्यांनी गुरु रविदास यांच्या प्रतिमेचे पूजन केले व अभिवादन केले.
पुढे महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी हर्षकुमार देशमुख, विलास शिंदे, रणजीत डेडवाल, राजेंद्र दारुंटे उपस्थित होते. मिरवणूक महाराणा चौकातून अभिवादन केल्यानंतर माजी आमदार श्री चंद्रकांत दानवे व श्री बंटी काका यांनी गुरु रविदासांना अभिवादन केले. मिरवणुकीचे पुढे कैलास मंगल कार्यालय येथे सभेत रूपांतर होऊन प्रतिमा पूजन करून श्री आढावणे महाराज यांचे मार्गदर्शन झाले. यावेळी श्री रामेश्वर तिरमुखे प्रबोधनकार व लेखक यांचे व्याख्यान प्रबोधन संपन्न झाले.
या दरम्यान श्री श्रावण कुमार अक्से, ऍडव्होकेट एफ. एच. सिरसाट, श्री रमेश बिरसोने, श्री गणेश हिरेकर यांची भाषणे झाली. दरम्यान प्रास्ताविक श्री बि.एल.बडगे यांनी केले तर सूत्रसंचालन श्री सांडूजी आकोदे सर यांनी केले. यावेळी उत्सव समितीचे अध्यक्ष श्री गणेश हिरेकर उपाध्यक्ष श्री रमेश बिरसोने, सचिव श्री सतीश पुसे, कोषाध्यक्ष श्री भानुदास सपकाळ,श्री.गणेश बनस्वाल, कोषाध्यक्ष श्री मधुकर ढोले,उखाजी जाधव, देवलाल आकोदे, श्री बारवाल सर, श्री बैनाडे सर, श्री दादाराव मस्के सर, श्री दिलीप सोनवणे सर, आनंदा आक्से, प्रफुल्ल कुमार आक्से, पुरणलाल बिरसोने, सोनाजी आक्से, श्री कृष्णा शेळके, श्री रामदास शेळके, सांडुजी आक्से, सुरेश बडोदे साहेब तसेच समाजातील महिला भगिनींनी सहभाग घेतला.
त्याचप्रमाणे रामचंद्र काकडे, नारायण कटारे, रामेश्वर जाधव, भगवान बैनाडे,संजय अंदुरे, मोतीराम सोनवणे, नंदू डवरे,संदीप यशवंते, शेळके सर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती यांनी गुरू रविदास यांना अभिवादन केले. तसेच कार्यक्रमास नारायण मस्के, रामदास शेळके, भारत रगडे गजानन मैंद सर, शिरसाट साहेब, शिरसाट सर,भगवान शिरसाट, श्री भगवान देठे सर, इंगळे सर, संतोष इंगळे, एस बी नेवार साहेब त्याचप्रमाणे समाजातील रविदास नगर म्हाडा कॉलनी, बाबू जगजीवन राम नगर, कठोरा बाजार ,निमगाव तडेगाव, केदारखेडा, अनवा व संपूर्ण भोकरदन तालुक्यातील बहुभाषिक चर्मकार समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. आभार प्रदर्शन गोरखनाथ जाधव यांनी केले.
न्युज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे