मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलिवूड चित्रपटांमध्ये तब्बल १३ वर्षांनंतर ‘निकम्मा’ या चित्रपटातून कमबॅक करत आहे.
या चित्रपटात ती मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारणार आहे. ५ जून २०२० मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘निकम्मा’ या चित्रपटातून सेकंड इनिंग सुरू करत असल्याचे शिल्पाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून सांगितले आहे.
शिल्पा शेट्टी म्हणाली की, माझ्या सेकंड इनिंग मधल्या या पहिल्या चित्रपटासाठी मी फार उत्सुक आहे.
माझ्या आगामी ‘निकम्मा’ या चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खान करणार आहे. माझ्यासोबत या चित्रपटाच अभिमन्यू दसानी आणि शिर्ले सेतियाही दिसणार आहेत.