जालन्यात कॅफेमध्ये सुरू असलेल्या गोरख धंद्यायचा पर्दाफाश

जालना १ मार्च २०२४ : जालना शहरातील संभाजीनगर भागातील ‘गेट टूगेदर’ कॅफेमध्ये अधिकचे पैसे घेऊन, महाविद्यालयीन तरुण तरुणींना स्पेशल कंपार्टमेंट करून जागा उपलब्ध करून दिलं जातं असल्याची खळबळजनक घटना उघडकीस आलीय. सदर बाजार पोलिसांनी आचानक धडक कारवाई करून या गोरख धंद्याचा पर्दाफाश केलाय.

शहरातील गेट टू गेदर कॅफेमध्ये अधिकचे पैसे घेऊन महाविद्यालयीन तरुण तरुणींना स्पेशल कंपार्टमेंट जागा उपलब्ध करून दिली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिस कारवाईत सदर ठिकाणी दोन महाविद्यालयीन तरुण तरुणी मिळून आल्या. त्यांना पोलिसांनी समज देऊन पालकांच्या ताब्यात दिले आहे. तर कॅफे मालक यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय साळी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा