भोकरदन, जालना ५ मार्च २०२४ : जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथे मोबाइलची येथे निकामी झालेली बॅटरी कानाला लावून खेळत असताना स्फोट होऊन, अंगणवाडीमध्ये शिक्षण घेत असलेल्या समर्थ परशुराम तायडे (वय ५ वर्ष) याबालकाचा जागीच मृत्यू झाला.
सिल्लोड तालुक्यातील आमठाणा येथील रहिवासी असणारा समर्थ हा कुंभारी येथे आई-वडिलांसोबत नातेवाईक गणेश दांडगे यांच्या घरी आला होता. सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान इतर मुलांसोबत खेळत असताना समर्थने निकामी झालेली मोबाइलची बॅटरी कानाला लावली. दरम्यान बॅटरीचा स्फोट होवुन जोराचा आवाज झाला . यामुळे समर्थचा कान तुटून पडला तसेच डोक्याला जबर मार लागल्याने समर्थचा जागीच मृत्यू झाला.
भोकरदन येथील ग्रामीण रुग्णलयात दाखल करून उत्तरीय तपासणी करण्यात आली. भोकरदन पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटना स्थळी दाखल होवुन पाहणी करून पंचनामा केल्यानंतर नोंद घेण्यात आली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी : कमलकिशोर जोगदंडे