नाशिकच्या नांदगाव शहरातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी दोन नराधमांना अटक

नांदगाव, नाशिक ६ मार्च २०२४ : नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील एका अल्पवयीन मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेऊन, आरोपी हर्षदखान इनामदार या २२ वर्षीय नराधमाने आपला मित्र मुशरफखान गुलशरखान पठाण याला सोबत घेऊन तिचा विनयभंग केला. या बाबत गुन्हा दाखल झाला असून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलय.

आम्हांला तुझ्याशी काही बोलायचे आहे, असे सांगून मुलीस घरी बोलावुन बळजबरीने तिचा विनयभंग केला. पीडित अल्पवयीन मुलीने त्याला विरोध करून बाहेर पळण्याचा प्रयत्न केला,परंतु दुसऱ्या आरोपीने तिला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने आरडा ओरडा केला आणि बाहेर पळून आली. त्यावेळी परिसरातील महिलांनी अल्पवयीन मुलीची सुटका केली. सदर प्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या मोठ्या बहिणीला सांगितले असता त्यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नांदगाव पोलिस ठाण्यात बाल कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा