भोकरदन, २७ एप्रिल २०२४ : भोकरदन तालुक्यातील कोठाकोळी परिसरात वीज पडून एकाचा मृत्यू तर ३ जण जखमी झाले आहे. गुरवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे ही वीज पडली असून त्यात कोमल वराडे, किरण बावस्कर, सोनाजी सोनुने आणि बाळू वराडे हे चौघे भाजून जखमी झाले होते.
या चौघांना वैद्यकीय उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले असता सोनाजी सोनुने यांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यु झाला.
याच पार्श्वभूमीवर कोठाकोळी येथे आ. संतोष दानवे यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली आहे. तर या दुर्दैवी घटनेत जखमी झालेल्यांना नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रत्येकी १२ हजार रुपये तर मृत्युमुखी पडलेल्या कै. सोनाजी सोनुने यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपये नुकसान भरपाई मिळवून देणार असल्याचे आश्वासन आ. संतोष दानवें नी दिले. याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती.
न्यूज अनकट प्रतिनीधी : कमलकिशोर जोगदंडे