भंडाऱ्यात रोड अपघात मध्ये एक ठार

भंडारा ८ जुलै २०२४ : भंडारा हायवे क्रमांक ५३ वर कार्धा टोलनाक्या जवळ मुख्य रस्त्यावर एक भयंकर अपघात झाला. या अपघातात एक ट्रक आणि एक मोटारसायकल यांचा समावेश होता. लोखंडी साहित्याने भरलेला लोडेड ट्रक क्र.CG- 04 MT 9496 हा नागपूर दिशेला जात असताना कार्धा टोलनाक्या जवळ मजुरांना कामं सांगून घरी परतणाऱ्या मुकादमाच्या मोटारसायकलला धडक झाली.

अपघात एवढा भीषण होता की, मोटार सायकल ट्रकच्या आतमध्ये घुसून चकणाचूर होऊन मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि वैद्यकीय पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : हंसराज रामटेके

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा