लातूर ६ ऑगस्ट २०२४ : लातूर जिल्ह्यातील लोहारा येथील रहिवासी हुसेन पठाण हे हरियाणा येथील rovitex agro chem या कंपनीचे सेल्स मॅनेजर या पदावर लातूर जिल्ह्यातल काम पाहतात. हुसेनचा मित्र अब्दुल रहेमान याने लखन माने यांना ओळखीवर कोंबडीचे खाद्य उधारीवर देण्यास सांगितले. हुसेन ने २६ ऑक्टोंबर २०२३ ला एकोणीस लाख बत्तीस हजार पाचशे रुपयांचे ६०० पोते कोंबडीचे खाद्य १५ दिवसांच्या उधारीवर दिले. करार तत्त्वावर २ चेक, शंभर रुपयाचे स्टॅम्प, आधार, पॅन घेतले.
१५ दिवसांनी हुसेन यांनी माने याला पेमेंट संदर्भात कॉल केला असता त्याने सांगितले की, अब्दुल रहेमान व रौफ यांनी नामदेव कांदे यांना परळी येथे परस्पर माल विकला असून माझा या व्यवहाराशी काहीच संबंध नाही. हुसेन यांनी नामदेव कांदे यांना मालाबाबत विचारणा केली असता, अब्दुल रहमान व रौफ यांनी मार्केट रेट पेक्षा ५०० रुपय कमी दराने कोबडीचे खाद्य आपल्याला विकला असल्याची माहिती दिली. अब्दुल रहेमान याने आपली फसवणूक केल्याचे हुसेन पठाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांना याबाबत सविस्तर तक्रार दिली असून आपल्या मित्रावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीय.
न्यूज अनकट प्रतिनिधी : सलीम शेख