तरुणाच्या जाचाला कंटाळून हर्सुल येथील तरूणीने केली आत्महत्या

छत्रपती संभाजीनगर २१ ऑगस्ट २०२४ : छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल हद्दीत असलेल्या ओवर गावातील पुजा पवार वय वर्ष १६ या तरुणीने, एका तरुणाच्या जाचाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मृत तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हसूल पोलीस ठाण्यात मुख्य आरोपी काशीद पठाणसह त्याचे वडील यासीन पठाण, गफार पठाण, हरून पठाण, राजू पठाण राहणार ओवर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय.

पूजा पवार ही विज्ञान शाखेत शिकत होती, नीट क्लासेससाठी कोकणवाडीतील एका नामांकित क्लासला जाणारी पूजा कोकणवाडीतील एका वस्तीगृहामध्ये राहत होती. ती सलग सुट्ट्या आणि रक्षाबंधनानिमित्त तीन दिवसांपूर्वीच गावी आली होती.

दरम्यान मागील आठ महिन्यापासून आरोपी कासिम पठाण तिच्या तिला प्रेम कर म्हणत बळजबरी करत होता. ती गावे आल्याची संधी साधून त्याने पुन्हा त्रास दिला. त्यामुळे तणावातून पूजाने विहीरीत उडी मारून जीवन संपवल. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी पूजाला बाहेर काढून घाटी रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या प्रकरणातील सात आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरू आहे.

न्युज अनकट प्रतिनीधी : संजय आहेर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा