मनमाड जवळच्या रापलीतील बेपत्ता पाच वर्षीय चिमुकल्याचा विहिरीत सापडला मृतदेह

चांदवड, नाशिक ३ सप्टेंबर २०२४ : नाशिकच्या चांदवड तालुक्यातील मनमाड जवळील रापली गावातील पाच वर्षांचा चिमुकला कृष्णा बिडगर काल पासून बेपत्ता झाला होता. गावातील ग्रामस्थांनी या बालकाचा कसून शोध घेतला पण कुठेच शोध लागला नाही. या बालकाचे अपहरण केले तर नाही ना? अशा चर्चा गावात होऊ लागल्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. नासिक पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने,अप्पर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती,उपअधीक्षक बाजीराव महाजन,पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या टीमने गावात भेट देत ग्रामस्थांनी व पोलिसांनी शोधकार्य सुरू केले,मात्र कृष्णा कुठेही मिळून आला नाही. गावातील तरुणांनी घरा जवळील विहिरी पुन्हा बघण्यास सुरवात केली असता त्यांना घराजवळील त्यांच्याच वीहिरीत कृष्णाचा मृतदेह आढळून आला. येथील सामाजिक कार्यकर्ते भागवत झालटे यांनी १० परस खोल विहिरीत उतरून कृष्णाचा मृतदेह बाहेर काढला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून या बालकाचा घात झाला, की अपघात असा प्रश्न उपस्थित केला जात असून, या घटनेचा चांदवड पोलीस तपास करत आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी :नाना आहिरे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा