नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील टी-९ वाघाचा वर्चस्वाच्या झुंजीत मृत्यू

गोंदिया २३ सप्टेंबर २०२४ : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव गाभा क्षेत्रात दोन वाघाच्या झालेल्या झुंजीत टी-९ या नर वाघाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. नागझिऱ्याच्या मंगेझरी रोड नागदेव पहाडी परिसरात वनविभागाचे बिटरक्षक जे. एस. केंद्रे हे आपल्या टीमसह नियमीत गस्ती वर असताना, अंदाजे ९ ते १० वर्षाचा टी-९ हा नर वाघ मृत अवस्थेत दिसून आला.

सदर घटनेबाबतची माहिती बिटरक्षक केंद्रे यांनी तात्काळ वरिष्ठ वनअधिकारी यांना कळविली. घटनेची माहिती प्राप्त होताच नवेगांव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्र उपवनसंरक्षक तथा क्षेत्रसंचालक जयराम गौडा हे घटनास्थळी दाखल झाले. पशुवैद्यकिय अधिकाऱ्यांच्या चमुद्वारे मृत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले असुन वाघाचे व्हिसेरा सॅम्पल उत्तरीय तपासणी करीता संकलित करण्यात आले आहेत. मृत नर वाघ हा टी-९असून तो वर्चस्वाच्या झुंजीत गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला असावा, असा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकिय अधिकारी यांनी वर्तविलेला आहे. मृत वाघाचे सर्व अवयव शाबुत अवस्थेत आढळून आलेले असून शवविच्छेदानंतर वाघाचे पंचासमक्ष दहन करण्यात आले.

न्युज अनकट प्रतिनिधी : नविन दहिकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा