चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारताकडून पाकिस्तानला मोठा धक्का, जर्सीवर पाकिस्तानचे नाव वापरण्यास नकार..

54

दिल्ली २१ जानेवारी २०२५ : भारत आणि पाकिस्तान या उभय संघातील सामना नेहमीच चर्चेचा असतो. पुढच्या महिन्यात म्हणजेच ६ फेब्रुवारी पासून चँपियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. १९९६ मध्ये खेळलेल्या गेलेल्या एकदिवशीय विश्वचषकानंतर प्रथमच पाकिस्तान आयसीसी स्पर्धेचे यजनमानपद भूषविण्यासाठी तयार झाला असून २०१७ नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळाले आहे. मात्र, या स्पर्धेपूर्वी भारतीय संघाने पाकिस्तानला अजून एक मोठा धक्का दिला आहे. यामुळे पाकिस्तान बीसीसीआयकडे दाद मागण्यासाठी जाणार असल्याचे सांगितले जातय.

सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडियाने पाकिस्तानला जाऊन स्पर्धेत भाग घेण्यासाठी नकार दिला होता. आता वृत्तानुसार महत्वाची अपडेट्स समोर आली आहे. ती म्हणजे, ज्या देशाकडे आयसीसी स्पर्धेचे यजमानपद असते, त्या संघाचे प्रत्येक संघाच्या जर्सीवर नाव लिहिलेले असते. मात्र, भारतीय संघाने आपल्या जर्सीवर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचे नाव लिहिण्यास नकार दिल्याचा दावा केला जात आहे. पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले कि, भारतीय क्रिकेट बोर्ड राजकारण करत आहे जे खेळासाठी चांगले नाही.

रोहित शर्माला पाकिस्तान बोर्डाने समारंभासाठी बोलवले होते, त्यावेळी सुद्धा त्याला बीसीसीआयने नकार दिल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. भारताने पाकिस्तानला न जाण्याचा निर्णय घेतल्याने आयसीसीला यामध्ये नक्कीच हस्तक्षेप करावा लागणार आहे. यानंतर भारत आपले सर्व सामने दुबईत खेळेल, तर राहिलेले उर्वरित सामने पाकिस्तानात खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता आयसीसी काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर