आज “राष्ट्रीय मतदान दिवस” संपूर्ण भारतभर साजरा केला जातोय, जाणून घ्या या दिनाचे महत्व

319

25 जानेवारी 2025 राष्ट्रीय मतदान दिवस: आज संपूर्ण भारतात राष्ट्रीय मतदान दिन साजरा केला जातोय पण नेमके या दिनाचे महत्व काय ? तसेच हा हक्क बजवल्यानंतर समाजात काय परिणाम होतात? यामध्ये नेमकी मतदारांची भूमिका काय असते ? तसेच नागरिकांनी हा हक्क बजावण का गरजेचे आहे. या बद्दल आपण जाणून घेणार आहे. मतदानाची लोकशाहीत जागरूकता निर्माण व्हावी यासाठी दरवर्षी 25 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. जगातील सर्वात मोठी लोकशाही अशी आपल्या भारत देशाची ओळख आहे. तीच ओळख सांगण्यासाठी आणि भारतात लोकशाही व्यवस्था टिकवण्यासाठी दरवर्षी मतदान दिवस साजरा केला जातो.

स्वातंत्र्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी देशात संविधान लागू झाले. भारतात 18 वर्ष पूर्ण असलेल्या प्रत्येक लिंगच्या व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. नागरीकांनी आपल्या मताचा योग्य प्रकारे वापर केला तर योग्य प्रतिनिधि निवडून येईल आणि त्यामुळे आपली लोकशाही अधिक बळकट होण्यास मदत होईल.

राष्ट्रीय मतदान दिवस कधी आहे ?

सर्वप्रथम 2011 मध्ये प्रतिभादेवी पाटील राष्ट्रपती असताना त्यांनी पहिल्यांदा 25 जानेवारी रोजी “राष्ट्रीय मतदार दिन” साजरा करण्यास सुरुवास केली. त्यानुसार प्रत्येक वर्षी 25 जानेवारे हा दिवस भारतामध्ये राष्ट्रीय मतदान दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवसी विविध राजकीय पक्ष आणि केंद्र व राज्य सरकारकडून अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. आपल्या भारत देशात 18 वर्ष पूर्ण असलेल्या आणि मतदार यादीत नाव असणाऱ्या सर्व नागरिकांना मत देण्याचा अधिकार आहे. यामध्ये धर्म, जात, लिंग, संप्रदाय अशा कोणत्याच निकषावर भेदभाव न करता कोणालाही अधिकार बजावता येऊ शकतो.

25 जानेवारीलाच का ?

हा दिवस याच दिवशी का साजरा केला जातो हा प्रश्न सगळ्यांना पडलाच असेल आपल्या भारताचे संविधान 1947 साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तीन वर्षांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 मध्ये लागू झाले, त्याच्या एकदिवस आधी 25 जानेवारी 1950 मध्ये निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण भारतभर 26 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

काय आहे या दिवसाचे महत्व :

आपण बलाढ्य लोकशाहीत राहतो त्यामुळे प्रत्येक नागरिकाला निवडणुकीच्या रिंगणात उभ राहण्याचा अधिकार असतो तसेच रिंगणात उतरलेल्या प्रतिनिधीबाबत माहिती मिळवण्याचा अधिकार मतदारांना आहे. त्यामध्ये उमेदवाराची संपत्ती, गुन्हेगारी गुन्हे, शिक्षण अशा सर्व गोष्टी मतदारांना जाणून घेण्याचा

न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर