पुणे, ६ फेब्रुवारी २०२५ : सोन्याची खरेदी जोरात! दागिन्यांव्यतिरिक्त डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ, बार आणि नाण्यांमध्ये गुंतवणूक वाढल्याने, भारताची मागणी ८०२ टक्क्यांवर पोहोचली आहे. लग्नसराई आणि सणासुदीमुळे मागणीत मोठी वाढ झाली आहे.
सोन्यात गुंतवणुकीचा ट्रेंड
पारंपरिक दागिन्यांव्यतिरिक्त, गुंतवणूकदार आता डिजिटल गोल्ड, गोल्ड ईटीएफ आणि सार्वभौम सुवर्ण रोखेमध्येही मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत. बार आणि नाण्यांमध्ये केलेली गुंतवणूक २९ टक्क्यांनी वाढून २३९.४ टनांवर पोहोचली आहे. गुंतवणूकदारांना गोल्ड ईटीएफ, डिजिटल गोल्ड, सोन्याची नाणी आणि सोन्याचे बार हे गुंतवणुकीचे सुरक्षित आणि आकर्षक पर्याय वाटत आहेत.
दागिन्यांची मागणी घटली
२०२४ मध्ये ग्राहकांच्या खरेदी शक्तीवर परिणाम झाल्यामुळे दागिन्यांची मागणी ११ टक्क्यांनी घटली आहे. तरीही, मूल्याच्या दृष्टीने विचार केल्यास, मागणी ९ टक्क्यांनी वाढून १४४ अब्जांवर पोहोचली आहे. सोन्याच्या वाढलेल्या किमतीमुळे विक्रीवर परिणाम झाला आहे. अनेक भारतीय पर्यटकांनी दुबईसारख्या देशांमध्ये सोने खरेदी करणे कमी केले आहे.
सोन्याने दिला ‘भरपूर’ परतावा
२०२४ मध्ये सोन्याच्या गुंतवणुकीत आश्चर्यकारक २६ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. सोन्यातील वार्षिक गुंतवणूक १,१८० टन झाली आहे, ज्याचे मूल्य ९० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतके आहे. भारत आणि चीनमधील वाढीमुळे, अमेरिका आणि युरोपमधील घसरणीची भरपाई झाली आहे. बार आणि नाण्यांमध्ये भारताकडून 2024 मध्ये २९ टक्के गुंतवणूक वाढली आहे.
भारतातील सोन्याची मागणी (टनामध्ये)
वर्ष | मागणी | दागिने | गुंतवणूक | आरबीआय |
---|---|---|---|---|
२०२३ | ७६१ | ५७५.८ | १८५.२ | १६ |
२०२४ | ८०२.८ | ५६३.४ | २३९.९ | ७३ |
सोन्याच्या गुंतवणुकीत मोठी वाढ झाली आहे. २०२० नंतरची ही सर्वात मोठी वाढ आहे. युद्ध आणि राजकीय अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती वाढल्या आहेत. तरीही, दागिन्यांची मागणी घटली आहे, कारण सोन्याच्या वाढलेल्या किमतीचा विक्रीवर परिणाम झाला आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी ; सोनाली तांबे