कटकमध्ये शतक केल्यानंतर रोहितने दिली प्रतिक्रिया, म्हणाला मी इथे खूप..”

31

१० फेब्रुवारी २०२५ कटक : भारताने इंग्लंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात ४ गडी राखून विजय मिळवला. यामध्ये टीम इंडियाच्या कर्णधाराने सर्वाधिक जलद शतक झळकावत टीकाकरांना चोख त्युत्तर दिले आहे. हिट मॅन बऱ्याच दिवसांपासून चांगला फॉर्म गावसत होता आणि अखेर त्याच्या प्रयत्नाना कटकमध्ये यश आले ही चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी खूप आनंदाची बातमी आहे. रोहितने ९० चेंडूत १२ चौकार आणि ७ षटकरांच्या जोरावर ११९ धावा केल्या. एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपले ३२ वे शतक पूर्ण केल्यानंतर बीसीसीआयने त्याच्या मानसिकतेबद्दल एक खास व्हिडओ शेअर केला आहे. ज्यात त्याने त्याच्या खेळा आणि योजनेबद्दल सांगितले आहे. चला तर मग जाणून घेऊया या बतमीतून.

एक- दोन डावांनी माझा विचार बदलत नाही – रोहित शर्मा

भारतीय क्रिकेट बोर्डाने शेयर केलेल्या व्हिडिओत रोहित शर्मा म्हणाला की, जेव्हा तुम्ही इतका वेळ खेळता आणि धावा काढता तेव्हा तुम्हाला काय करायचे हे माहीत असते. यावेळी खेळाडूने त्याच्या मानसिकतेवर विश्वास ठेवावा.

“मी हेच बोलत होतो की, जेव्हा लोक इतकी वर्षे खेळतात आणि इतके धावा करतात. याचा अर्थ काहीतरी आहे.मी बरेच वर्ष क्रिकेट खेळत आलो आहे आणि मला माहीत आहे की त्यासाठी काय आवश्यक आहे.फक्त बाहेर जाऊन तुमचे काम करत राहायचे. आज मी तेच केले.”

असे म्हणत रोहित पुढे म्हणाला,

“मी ज्या पद्धतीने फलंदाजी करतो तशीच फलंदाजी करेन. मी म्हटल्याप्रमाणे मी इथे बराच काळ आहे, त्यामुळे एक किंवा दोन डावांनी माझा विचार बदलत नाही.आम्हाला आमचे काम करायचे होते. आणि आपलं काम तिथे जाऊन आपला खेळ खेळणं आहे. जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा तुम्हाला माहित असते की तुम्ही तुमचे सर्वोत्तम दिले आहे, शेवटी तेच महत्त्वाचे असते.”

न्यूज अनकट प्रतिनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा