Jasprit Bumrah Replacement ११ फेब्रुवारी २०२५ : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा हंगाम सुरू होण्यासाठी काहीच दिवस उरले असून येत्या १९ फेब्रुवारीपासून ट्रॉफीला सुरुवात होत आहे. यातच आता सर्व संघाच्या खेळाडूंना दुखपतीचा सामना करावा लागत आहे. भारतीय संघाला सुद्धा हा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बूमराहला दुखापत झाली. त्यामुळे भारतीय संघ चिंतेत आहे. ११ फेब्रुवारी पर्यंत सर्व संघाना आपल्या टीममध्ये बदल करण्याची संधी आहे. पण जसप्रीत बूमराहबाबत अद्याप कोणतेही अपडेट समोर आलेली नाही.
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉर्डर- गावस्कर ट्रॉफीत जसप्रीत बूमराहला दुखापत झाली होती. या कसोटीत त्याने शानदार कामगिरी केली होती. त्याने तब्बल ३१ विकेट्स आपल्या नावावर करून मालिकावीर पुरस्कार मिळवला होता. पण सिडनीमध्ये त्याच्या पाठीला दुखापत झाली आणि मधूनच त्याला मैदान सोडावे लागले होते.
येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सरावासाठी भारत आणि इंग्लंड यांच्यात ३ सामन्यांची वनडे मालिका सुरू आहे. ज्यात बूमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद शमी आणि हार्दिक पांड्या या वेगवान गोलंदाजी बरोबर तिसरा वेगवान गोलंदाज म्हणून हर्षित रानाला संधी मिळाली. पण चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी जसप्रीत बूमराह फिट झाला नाही, तर त्याच्या जागी कोणाला संधी मिळू ते जाणून घेऊ.
शार्दुल ठाकूर :
सध्या शार्दुल ठाकूर सुद्धा दुखापतीमुळे बाहेर आहे., शार्दुलला वेगवान गोलंदाजीचा अनुभव असल्याने जसप्रीत बूमराहच्या जागी तो सुद्धा आदर्श गोलंदाज म्हणून पर्याय ठरू शकतो. याशिवाय तो मधल्या फळीत उत्तम फलंदाजीची भूमिका बाजावू शकतो. शार्दुलने रणजी ट्रॉफी २०२४-१५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असून ८ सामन्यात त्याने ३९६ धावा आणि ३० विकेट घेतल्या आहेत. त्याचा सध्याचा फॉर्म भारतासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खूप महत्त्वाचा ठरू शकतो.


हर्षित राणा :
संध्या भारतीय संघाकडून तिसरा वेगवान म्हणून हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे. इंगलंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे. त्याने पहिल्याच सामन्यात ३ विकेट्स घेत चांगली कामगिरी केली आहे. आता पर्यंत त्याने त्याच्या कारकिर्दीत २ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने ४ विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत. त्यामुळे मोहम्मद सिराज नंतर चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हर्षित पर्याय असू शकतो.


न्यूज अनकट प्रतीनिधी : प्रथमेश पाटणकर