प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर
गेली २ वर्षे ज्यांच्या नेतृत्वाखाली मणीपुर वांशिक वणव्यात होरपळून निघाले, महिलांवर आणि सामान्य लोकांनवर अत्याचार झाले. अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला. पण तरी देखील या सत्ताधारी पक्षाने जनतेला प्राधान्य न देता, आपल्या सत्तेलाच प्राधान्य दिल्याच्या चर्चा समोर येत होत्या. पण अखेर सर्व प्रकरण घडून गेल्यानंतर या सत्ताधारी पक्षाचे डोळे उघडले. ते म्हणजे एन .बिरेन सिंह यांनी माणिपूरच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. वांशिक हिंसाचार आटोक्यात आणण्याच्या प्रकरणात अपयशी ठरल्याची शिक्षा म्हणून बिरेन सिंह यांना भाजपने राजीनामा द्यायला सांगितला अशी माहिती समोर येत आहे, पण नक्की त्यांच्या राजीनाम्याच कारण काय ? भाजपने अचानक असा निर्णय का घेतला? हेच जाणून या..!
कुकी आणि मैतेयी वाद :
७ नोव्हेंबर २०२३ रोजी मणिपूरमध्ये सहा जणांचे मृतदेह सापडले, ज्यात दोन लहान मुले होती. त्यानंतर मैती गटाने झैरावन गावावर हल्ला केला, एका महिलेची हत्या करून शाळेला आग लावली. या हिंसाचारामुळे मणिपूरमध्ये तणाव वाढला. सीआरपीएफने दुर्लक्ष केल्याचा आरोप कुकी लोकांनी केला. पण या हिंसचारतून माणिपूरला सोडवण्यापेक्षा आमदार स्वत: चीच पोळी भाजू लागले.


ऑक्टोंबरमध्ये भाजपच्या आमदारांनी बिरेन सिंह यांच्या जागी मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यासाठी रांगा लावल्या. परंतु, भाजपने बिरेन सिंह यांना पाठिंबा देण सुरूच ठेवल. सोमवारपासून माणिपूरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. यात असहमत आमदारांनी आणि कॉँग्रेसने अविश्वासच्या प्रस्तावाला पाठिंबा देण्याच्या निर्णय घेतला. त्यातच माणिपूरचे ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्री यमनम खेमचंद सिंग यांनी ३ फेब्रुवारीला नवी दिल्लीतून भाजपला एक इशारा दिला, की जर मुख्यमंत्री बदलले नाहीत तर सरकार कोसळेल. याबाबतची माहिती ४ फेब्रुवारीला राज्यपाल ए. के.भल्ला यांनी गृहमंत्री अमित शाह यांना दिली.
पुढे ५ फेब्रुवारीला बिरेन सिंह अमित शहांच्या भेटीला गेले होते, परंतु त्यांना शहांची भेट घेता आली नाही. त्याच्या दुसऱ्या दिवशी बिरेन आणि त्यांच्या मंत्र्यांनी महाकुंभ मेळयात प्रयागराजला भेट दिली. मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्याविरुद्ध दबाव वाढत असल्याने, अमित शाह आणि जेपी नड्डा यांच्यात २ तास चर्चा झाली आणि बिरेन सिंह यांच्या मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असलेली टांगती तलवार कोसळली त्यामुळे बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. अशी माहिती द इंडियन एक्स्प्रेएसने दिली.

यातच सामना वृत्तपत्रातून भाजपवर एक खोचक टीका करण्यात आली :
“आता परिस्थितीच अशी निर्माण झाली होती की, भाजपसमोर दुसरा पर्यायच उरला नव्हता. एक तर बिरेन यांचा राजीनामा घ्या आणि कशीबशी सत्ता वाचवा, नाहीतर मणिपूरमधील सत्ता गमवा, हे दोनच पर्याय भाजपसमोर होते. मणिपूर विधानसभेच्या आजपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात काँग्रेस पक्ष बिरेन सिंह सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणणार हे निश्चित होते. त्याला भाजपमधीलच असंतुष्ट आणि बिरेन सिंह यांच्यावर नाराज असणाऱ्या आमदारांची साथ मिळणार असेदेखील चित्र होते. या आमदारांच्या गटाने त्याची कल्पना भाजप धुरिणांना दिली होती. कॉनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टीने तर आधीच या सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. अशा स्थितीत बिरेन सिंह यांचा ‘धोंडा’ पायावर पाडून घेण्यापेक्षा त्यांना ‘नारळ’ देऊन सरकार वाचविण्याचा मार्ग भाजपने निवडला,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.”
पण बिरेन सिंह यांच्या राजीनाम्याने भाजपने फक्त माणिपूरची समजूत काढलीये का ? हिंसेच्या वणव्यात अडकलेल्या माणिपूरला कोण सोडवणार ? यावर भाजपच सरकार काय पाऊलं उचलाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.