पुणे १८ फेब्रुवारी २०२५: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १९ फेब्रुवारी रोजी भवानी पेठ येथे शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. यामुळे लक्ष्मी रस्ता आणि शिवाजी रस्त्यावर वाहतुकीत बदल होणार आहेत. याच वेळी पीएमपी बसच्या मार्गांमध्ये देखील बदल करण्यात आले आहेत.
या मार्गांवर होणार बदल
मार्ग क्रमांक: २, २अ, २ब, ११, ११अ, ११क, १३, १७, २१, २१अ, ३७, ३८, २१६, २९८ व ३५४
मार्ग: जेएम रोडने बालगंधर्व, डेक्कन, अलका टॉकीज चौक, कुमठेकर रोड, विश्रामबाग, मंडईमार्गे स्वारगेट चौक.
मार्ग क्रमांक: ३५, ३६, ८२, ८७, ८७अ, ९९, १००, १०७, १०९, ११०, ११४, ११५, ११९, १२१, १२२, १२३, १४२, १४५, १५२, १६८, २०४, २०८, २१०, २१४, ३२२, ३२२अ, ३२३, ३२३अ व ३३३.
मार्ग: मनपा भवनकडून जाताना शिवाजी पुतळा येथे रस्ता बंद झाल्यानंतर ढोले पाटील रोड, फर्ग्युसन रोडने संचलन.
मार्ग क्रमांक: ५, ६, २४, २४अ, ३९, १४०, १४१, १७२, २३५ व २३६
मार्ग: लक्ष्मी रोड वाहतुकीस बंद झाल्यावर पुणे स्टेशन, पोलिस आयुक्त कार्यालय, वेस्ट एंड टॉकीज, महात्मा गांधी बसस्थानक, गोळीबार मैदान, स्वारगेट.
मार्ग क्रमांक: ३, ९, ५७, ८१, ९४, १०८, १४३, १४४, १४४अ, १४४क, १७४ व २८३
मार्ग: फडके हौद/दारूवाला पूल वाहतुकीस बंद झाल्यानंतर, पुणे स्टेशनकडे जाताना कुंभारवाडा, जुना बाजार, मंगळवार पेठ.
मार्ग क्रमांक: ७, १९७ व २०२.
मार्ग: भवानी माता मंदिर रस्ता बंद झाल्यानंत पुलगेट, गोळीबार मैदान, स्वारगेट, रामेश्वर चौक, कुमठेकर रोडने नियमित मार्ग.
मार्ग क्रमांक: ८, ९, १८० व १८१.
मार्ग: न. ता. वाडीकडून जाताना कुंभारवाडा, गाडीतळ, पुणे स्टेशन, वेस्ट एंड टॉकीज, महात्मा गांधी बसस्थानक.
प्रवाशांसाठी सूचना
- बस मार्गांमधील बदलामुळे प्रवासाला थोडा वेळ लागू शकतो.
- आपल्या सोयीनुसार पर्यायी मार्गांचा वापर करा.
- अधिक माहितीसाठी पीएमपी हेल्पलाइनवर संपर्क साधा.
पीएमपी प्रशासनाचे आवाहन
शिवजयंतीच्या या विशेष दिवशी पुणेकरांनी पीएमपी प्रशासनाला सहकार्य करावे आणि नियोजित बदलांची नोंद घ्यावी.
न्युज अनकट प्रतिनिधी – सोनाली तांबे