दिल्ली २० फेब्रुवारी २०२५: काही दिवसांपूर्वीच दिल्ली विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यात भारतीय जनता पार्टीने दिल्लीत सत्ता मिळवली. त्याचबरोबर दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काल दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची घोषणा झाली असून भारतीय जनता पार्टीच्या रेखा गुप्ता यांच्या हातात दिल्लीची जबाबदारी सोपवण्यात आली. यामध्येच कॉँग्रेसच्या नेत्या अल्का लांबा यांनी १९९५ सालचा एक फोटो शेअर करत रेखा गुप्ता यांचे अभिनंदन केले आहे.
१९९५ च्या DUSU शपथविधी सोहळ्याचा फोटो शेयर करताना अल्का लांबा यांनी ट्वीट करत लिहिले, हा १९९५ चा संस्मरणीय फोटो – जेव्हा रेखा गुप्ता आणि मी एकत्र शपथ घेतली होती मी NUSI कडून दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ अध्यक्षपद जिंकले होते आणि रेखा यांनी ABVP कडून सरचिटणीसपद जिंकले होते. रेखा गुप्ता यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा. दिल्लीला चौथ्या महिला मुख्यमंत्री मिळाल्याबद्दल अभिनंदन आणि आम्ही दिल्लीकरांना आशा करतो की आई यमुना स्वच्छ असेल आणि मुली सुरक्षित असतील.असे त्यांनी ट्वीट केले आहे.
अल्का लांबा यांना दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या कालकाजी मतदारसंघातून निवडणुकीला उभ्या राहिल्या होत्या. पण जेव्हा दिल्ली विधानसभेचा निकाल लागला तेव्हा त्यांना मोठ्या फरकाने हरल्या आणि तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या. तर रेखा गुप्ता यांनी आपच्या बंदना कुमारी यांचा २९ हजार ५९५मतांनी हरवले. आज रेखा गुप्ता दिल्लीच्या रामलीला मैदानावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे.
प्रथमेश पाटणकर, न्यूज अनकट प्रतिनिधी